जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील इकरा शिक्षण संस्था द्वारा संचलित एच जे थीम कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र ,जीवशास्त्र व पर्यावरण क्षेत्रातील प्रगती’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे सफल आयोजन करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ करीम सालार होते. कार्यक्रमात विद्यापीठाच्या केमिकल सायन्सचे संचालक प्रोफेसर दीपक दलाल यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाले. कार्यक्रमात सचिव एजाज गफ्फार मलिक, उपाध्यक्ष डॉ इकबाल शाह,मजीद शेठ जकेरिया आदी अतिथी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ तिलावत कुराण पठणाने करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनींनी संस्थेचे गीत ‘ तराना ए इकरा ‘ सादर केले गेले . आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. करीम सालार यांनी म्हटले की आंतरविद्याशाखीय परिषदेतील चिंतन शाश्वत विकासाकरिता पूरक असेल. नाविन्यपूर्ण, कल्पक, समाजाभिमुख संशोधनामुळे सन 2047 पर्यंत भारत महाशक्ती बनेल. प्रोफेसर दीपक दलाल म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण आंतरविद्याशाखिय अभ्यासाला प्रोत्साहन देईल. अशा प्रकारच्या परिषद, कार्यशाळा, चर्चासत्रामुळे नवीन संशोधक विद्यार्थी, शोध मार्गदर्शकांना नवकल्पना, प्रेरणा मिळतात.
सर्व मान्यवरांच्या हस्ते संकलित शोधनिबंधाच्या शोधपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. परिषदेत एकूण 320 प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या परिषदेत एकूण चार सत्रात विविध विद्यापीठातील विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले.परिषदेचे समन्वय प्रा डॉ वाय ई पटेल व डॉ मुस्तकीम बागवान, उपप्राचार्य डॉ वकार शेख, उपप्राचार्य डॉ तनवीर खान तसेच समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आएशा बासित, डॉ फिरदोस सिद्दिकी तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान यांचे मार्गदर्शन लाभले.