यावल शहरातील पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडे प्रस्ताव

yaval 5

 

यावल प्रतिनिधी । शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषदच्या विस्तारीत क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभास पाईप जोडणीसह विविध योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी आणि माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरात जवळपास 50 हजाराच्यावर लोकसंख्या पोहोचली आहे. यामुळे पाण्यासाठी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर प्रशासनाला पर्यायी मार्ग काढण्यात यश आले असुन यासाठी नगर परिषदच्या विस्तारीत क्षेत्रासह विविध योजनाची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी दिली आहे. येथील विकासाच्या दृष्टीकोणातून पत्रकार यांनी औपचारीकरित्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांना शहराच्या पाणीपुरवठा संदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या, शहरातील नागरीकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, हाच आमचा दृष्टीकोण असुन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावासाठी उन्हाळ्यात पाणीटंचाईला यावलकर सामोरे जावू नये, म्हणुन ३ कोटी रुपयांच्या खर्चाचे दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहे.  या जलकुंभातुन विस्तारीत भागातील जवळपास सुमारे ७ हजाराच्यावर असलेल्या लोकवस्तीला या जलकुंभातुन स्वच्छ, सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषदद्वारे या जलकुंभाला पाईपलाईन जोडणीसाठी शासनाकडे सुमारे ३ कोटी ५० लाखांच्या खर्चाचा अपेक्षीत आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यास पाईपलाईन जोडणीस तात्काळ कार्यारंभ करण्यात येईल. या दोघ प्रस्तावीत कामांना शासनाची मान्यता व निधी उपलब्ध झाल्यास शहरातील पिण्याच्या पाण्याचा संकट कायमचे दुर होईल, असा विश्वास पत्रकारांशी बोलतांना नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर नगर परिषद कार्यक्षेत्रातील विस्तारीत भागातील जवळपास दहा भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, याकरीता माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात दोन वर्षापुर्वी युध्दपातळीवर प्रयत्न करून शासनाकडुन वैशिष्टपुर्ण योजनेतून १० लाख लिटर पाण्याची साठवण क्षमता असलेल्या जलकुंभासाठी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून त्या कामास पुर्ण केले. मागील मार्च महिन्यात नगर परिषदेने या जलकुंभात 10 लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आली असुन या जलकुंभाचे काम हे अपुर्ण असल्याने नगर परिषदने जलकुंभ हस्तांरीत केले नसल्याचे त्यांनी यावेळी संगितले आहे.

Protected Content