फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगरू आणि MFUCTO आणि NMUCTO प्राध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.शिवाजीआण्णा पाटील यांनी आज धनाजी नाना महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी वाणिज्य विभागातील डॉ.रवि केसूर यांचे नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार वर्ष 23-24 या शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार एम.कॉम.भाग 1 साठी संशोधन पद्धती वाणिज्य आणि व्यवस्थापन तसेच व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही दोन पुस्तके माजी कुलगुरू ,एमफुक्टो प्राध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष व शिक्षणतज्ञ डॉ शिवाजी आण्णा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे ,उपप्राचार्य डॉ. व्ही. सी. बोरोले,उपप्राचार्य डॉ.एस. व्ही.जाधव, डॉ.पी.डी.पाटील,डॉ.जगदीश पाटील ,प्रा.शेरसिंग पाडवी .नितीन सपकाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे पदाधिकारी यांनी डॉ रवी केसुर यांचे कौतुक केले आहे