Suicide : महिलेची गळफास घेवून आत्महत्या

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथील ४५ वर्षीय महिलेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिलेल्या माहितीनुसार सुमनबाई विलास भालेराव (वय-४५) रा. डांभुर्णी ता. यावल या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवार १७ एप्रिल रोजी सुमनबाई भालेराव यांनी घरात कोणी नसताना दुपारी पंख्याच्या दांड्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान नातेवाईक हे घरी आल्यानंतर त्यांना सुमनाबाई यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजिज अमित शेख करीत आहे.

Protected Content