अकलुद ते दुसखेडा रस्त्यासाठी आंदोलन करणार : अतुल पाटील

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अकलूद फाटा ते दुसखेडा हा रस्ता जिल्हा मार्ग दर्जा प्राप्त असून सदर काम सुरु व्हावे म्हणून ८ ऑगस्ट २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. रस्ता पूर्ण करण्याची मुदत १ वर्ष होती. कामाची मुदत संपुन जवळपास दीड वर्ष झालीत तरी काम अपूर्णावस्थेत आहे.परिसरातील दुसखेडा, ग्रुप ग्रा प. कासवे, वाढोदा प्र सा. येथील सरपंच, ग्रां. प. सदस्य व ग्रामस्थ मिळुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन करतील अशी माहिती अतुल पाटील यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा चीतोडा, अट्रावल चिखली अंजळे दुसखेडा रोड हे काम अंदाजे १.२८ कोटी रू मंजुर करण्यात आले असुन सदर काम जळगाव येथील कंत्राटदार वाय एम. महाजन यांनी घेतले आहे. या कामास ४ ऑगस्ट २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. कामाची मुदत कार्यारंभ आदेश पासुन १२महिने होती. परंतु आजपर्यंत काम पुर्ण झालेले नाही या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली असुन काम अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे दुसखेडा, कासावा परिसराला लागुन असलेल्या सुमारे २०गावांच्य्या नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. अनेकांचे अपघात होऊन वाहने देखील नादुरुस्त झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यावल येथील अभियंता यांना अनेकवेळा सदर बाबतीत तक्रारी करुन देखील काहीही उपयोग झाला नाही म्हणून दुसखेडा, कसवा, कथोरा, आकलुज, वडोदा येथील काही ग्रामस्थ, सरपंच, सदस्य यांनी यावल येथील माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांना माहिती देऊन समस्या सुटली पाहिजे अशी गळ घातली. त्यानुसार त्यांनी ग्रामस्थ व सदस्य यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जहाँगिर तडवी, व अभियंता अजित निंबाळकर यांची भेट घेऊन मंजुर असलेले काम दोन दिवसात सुरु करून पूर्ण करावे अशी लेखी मागणी केली. काम त्वरित सुरू न केल्यास २७डिसेंबर रोजी दुसखेडा, कासवं, वडोदा, येथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यावल तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल येथील कार्यालय बाहेर ठीय्या आदोलान करतील असा इशारा दिला आहे. आपण आंदोलन करू नये या विषयी यावल सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने राष्ट्रवादीचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांना पाठवले असल्याची माहिती पाटील यांनी दिली असुन, वास्तविक पाहता मंजुर झालेले काम पुर्ण करण्याची जबाबदारी सर्वस्वी बांधकाम विभागाची आहे . संबधीत कामाच्या ठेकेदारास बांधकाम विभागाच्या वतीने थातुर मातुर नोटीस बजावण्यात आली असुन, मुदत संपुन गेली तरी काम पुर्ण झालेले नसल्याचे दिसून येत आहे . दुसखेडा कासवा परिसरातील रहिवासी नागरीक रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत . यावल सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता याला जबाबदार असुन काम पुर्ण न झाल्याच्या पार्श्वभुमीवर आंदोलन होणार हे निश्चित आहे असे अतुल पाटील यांनी म्हटले आहे .

Protected Content