डॉ.जी.डी. बेंडाळे यांच्या स्मृतींना उजाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब डॉ.जी. डी. बेंडाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या विकासात अण्णासाहेब डॉ.जी.डी. बेंडाळे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी शैक्षणिक चळवळीस मोठे बळ दिले, असे मत प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी व्यक्त केले. तसेच भगवान बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला, असेही वडोदकर म्हणाले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, कुलसचिव जगदीप बोरसे, मानव संसाधन विभागाचे प्रमुख गोकूळ पाटील, वित्त व लेखा अधिकारी युवराज राणे, आर्किटेक्ट अभिजीत महाजन, एस.पी. महाजन, दीपक दलाल, राजेश सरोदे, ओम चौधरी, जगदीश सावदेकर, कमलाकर आमोदकर, शरद चौधरी, प्रवीण बारी, रवी पाटील, मुकेश पाटील, उमेश ओगले, जितेंद्र सपके आदी उपस्थित होते.

Protected Content