यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रहिवासी तथा भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मास आलेले भालोद येथील प्राथमीक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज एम. तडवी यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजी नगर येथील एका खाजगी रूग्णालयात दिनांक ६ एप्रील रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोककळा पसरली. डॉ फिरोज तडवी यांनी केलेली निस्वार्थ सेवा व माणुसकी जपणारे कार्य हे सदैव यावलकरांच्या हदयात राहील. सर्वसामान्यांच्या उपचारासाठी अथक परिश्रम घेणारे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
डॉ. फिरोज तडवी यांचे मुळ गाव हे चोपडा तालुक्यातील लोणी हे होते. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक व आदिवासी समाजात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे एम. बी. तडवी यांचे जेष्ठ चिरंजिव व सरकारी वकील ॲड राजीव तडवी यांचे मोठे बंधु होते. त्यांच्या पश्चात पती,मुलगी,आई , वडील असे कुटुंब आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.