डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात चित्ररथाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त चित्ररथाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्यसंग्रामात शहीद झालेले स्वातंत्र्य सेनानी व स्वातंत्र्यवीर यांची माहिती दर्शविणारे फलक लावून चित्र रथ सजविण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने खानदेशातील विविध स्वातंत्र्य सेनानी व शहीद यांचा कार्यकाळ व कार्य तसेच आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना माहीत नसलेल्या स्वातंत्र्य सेनानी कार्याची ओळख दर्शविणारा व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तिमय वातावरण निर्माण करणारा चित्ररथ होता.

जळगाव शहरातील अनेक शाळेंमधून हा चित्ररथ फिरविण्यात आला यामध्ये पुष्पावती खुशाल गुळवे शाळा, शेठ ला ना सार्वजनिक विद्यालय , रावसाहेब रूपचंद, विद्यालय न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, अध्यापिका विद्यालय, अभिनव प्रा सराव पाठशाला, जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा व नंदिनी बाई वामनराव मुलींचे विद्यालय इत्यादी शाळांना भेटी देण्यात आल्या. या चित्ररथाच्या यात्रेदरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी विविध शहीद व शहीद महिला यांची माहिती शालेय विद्यार्थ्यांना दिली. देशभक्तीपर घोषणा देऊन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जोश पूर्ण वातावरण निर्मिती केली. विविध शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्ररथ यात्रेचा समारोप नंदिनीबाई वामनराव मुलींची विद्यालय येथे करण्यात आला. समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद तायडे उपस्थित होते.

माननीय प्राचार्य डॉ.गौरी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमृत महोत्सव कार्यक्रमांचे समन्वयक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संध्या फेगडे, डॉ. सुजाता गायकवाड, प्रा. एच आर जाधव, प्रा. दीपक किंनगे, डॉ सुहास पाटील यांनी आयोजित केला.या चित्ररथ यात्रेस शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र चीरमाडे, बन्सीलाल गांगे व महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content