यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाव्दारे संचालित सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केली.
याप्रसंगी स्कुलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या प्रमुख उपस्थित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती नितित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रशांत फेगडे यांच्यासह शिक्षीका सौ. मनिषा बडगुजर, अर्चना चौधरी, जागृती चौधरी, कुंदा नारखेडे, तृप्ती पवार, तेजस्विनी वाणी, वर्षा भुते, प्रविणा पाचपदे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते .