दहिगाव येथील शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद मराठी उर्दू शाळेच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व देशाच्या पहील्या महीला माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्ताने राष्ट्रीय एकता दिन म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी आदर्श विद्यालय दहिगाव येथे मशाल रॅलीला सुरूवात करण्यात आली.

शाळेचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल तर माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधीच्या प्रतिमेस दहिगाव केंद्र प्रमुख विजय ठाकूर या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक राजाराम महाजन, मुख्यध्यापक एस.डी. चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशाचे माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधींच्या जीवन कार्याचा परिचय अजय पाटील यांनी करून दिला. शालेय कार्यक्रमांतर्गत आदर्श विद्यालय दहिगाव, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद.उर्दू शाळा दहिगाव याच्या संयुक्त विद्यमाने गावातून मशाल रॅली विदयार्थीसह उत्साहात विविध राष्टीय एकतेच्या जयघोषात काढण्यात आली होती. याप्रसंगी आर.पी. साळुंखे, प्रतिभा पाटील, आर.आर.चौधरी, एन.पी.चव्हाण, एन.डी.पाटील, प्रल्हाद बादशहा, गणेश पाटील, आश्विन महाजन, एम.पी.पाटील, अरमान तडवी, हरीचंद्र महाजन, शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य व परिश्रम लाभले.

Protected Content