डॉ. भाग्यश्री भलवतकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

bhagyashri

जळगाव प्रतिनिधी । श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांचे जागतिक स्थान मिळवून देण्याच्या धोरणाने डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी स्थापन कलेल्या श्री. शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनँशनल) संस्थेच्या वतीने यंदा श्री. रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्कार, संस्कृत क्षेत्रात आणि शिवकालीन संस्कृत दुर्मिळ ग्रंथावर संशोधन केल. म्हणून मू.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. भाग्यश्री सुधीर भालवतकर यांना प्रभादेवी, मुबंई येथील पु.ल. देशपांडे सभागृहामध्ये शानदार सोहळ्यात, माजी लेफ्टनंट कर्नल मा. यशवंत देवस्थळी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, (दि.१५ जून) रोजी छ. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या भव्य सभागृहात ‘पेशवा मोरोपंत पिंगले जीवन गौरव पुरस्कार’, वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार व ‘श्री.रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर माजी लेफ्टनंट कर्नल मा.श्री. यशवंत देवस्थली, दादा शास्त्री पणशीकर, शिवाजी ज्ञानपीठाचे संस्थापक डॉ. हेमंतराजे गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल मा.यशवंत देवस्थली यांनी सीमेवरील अनेक आठवणी सांगितल्या व दादा शास्त्री पणशीकर यांनी शिवरायांच्या गुणांवर प्रकाश टाकला. संस्कृत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार-या महाराष्ट्रातील सहा संस्कृत प्रध्यापकांना श्री. रघुनाथ पंडित राष्ट्रिय पुरस्काराने गौरविण्यात आले. खान्देशातील मू.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. भाग्यश्री सुधीर भालवतकर यांना संस्कृत साहित्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आणि शिवकालीन संस्कृत साहित्यावर संशोधन केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवाजी द ग्रेटेस्ट’ ही चित्रपट दाखविण्यात आला. यात छ. शिवाजी महाराज हे अँलेक्झांडर, सिझर, हँनिबल, अँटीला, रिचर्ड, चिंगीज् खान, वाँलेस, निपोलियन, निओनिडास, गस्टावस या जगातील दहा महान योध्यांपेक्षा कसे महान आहेत याचे विवेचन यात करण्यात आले. डॉ, भाग्यश्री सुधीर भालवतकर यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष मा. नंदकुमार बेंडाळे व प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

Protected Content