विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक भविष्य होणार उज्वल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिशु विकास योजने अंतर्गत देशातील २० कोटी विद्यार्थी – विद्यार्थिनींचे शैक्षणिक भविष्य होणार उज्वल होणार असून या माध्यमातून इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना आरोग्य विमा, उच्च शिक्षण व शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.                            

यावल तालुक्यातील मारुळ येथे नुकतेच शिशु विकास योजने अतर्गत कार्यक्रम घेण्यात आले त्यात ३५ ते ४० विद्याथांना प्रमाणपत्र देण्यात आले.

खालीलप्रमाणे मिळेल शिशु विकास योजनेचा लाभ –

१) विद्यार्थ्यांना वार्षिक २५,००० रू आरोग्य विमा

२) विद्यार्थ्यांसोबतच आई – वडीलांना ३ लाख रुपयांचा अपघाती विमा

३) १२ वी नंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी १ ते ५ लाख रुपयांची शैक्षणिक मदत

४) इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थिनीना शिष्यवृत्ती

६ वी च्या विद्यार्थिनीला ३,००० रू प्रति वर्ष

८ वी च्या विद्यार्थिनीला ५,००० प्रती वर्ष

१० वी विद्यार्थिनीला ७,००० प्रती वर्ष

व १२ वी च्या विद्यार्थिनीला प्रतीवर्ष मिळणार ८,००० रुपये

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या एनजीओ A3N आयटी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून पालकांच्या परिस्थिती अभावी विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू नये व शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी देशातील २२ राज्यात शिशु विकास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना आरोग्य व शैक्षणिक व उच्च शैक्षणिक आर्थिक सुरक्षितता प्रदान केली जाणार आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय २०० पेक्षा अधिक प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसह सी.एस.आर.फंड आणि १२०० हून अधिक एनजीओ योजनेसाठी लागणारा निधी उभारण्याचे काम करीत आहेत.

शिशु विकास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील लाखो विद्यार्थ्यांना विमा कवच प्रदान केला आहे पाच लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील ५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना तर मुलींना वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ३ लाखाचा अपघात विमा २.५० लाखाचा आरोग्य विमा दरवर्षी २५ हजार रुपये प्रमाणे मिळेल. तसेच वयाच्या 21 वर्षानंतर मुलींना स्वयंरोजगारासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना आरोग्य शैक्षणिक व आर्थिक सुरक्षा देणे हाच या संस्थेचा हेतू आहे यासाठी पालकांकडून एका विद्यार्थिनीसाठी वार्षिक एकदाच २९५ + १०५ = ४०० रूपये (अधिक सर्विस सेवा शुल्क) आकारले जाणार आहे. ही संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया आहे. तसेच आपली नोंदणी शिशु विकास योजनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलद्वारेसुद्धा देता येऊ शकणार आहे.

तरी या योजनेचा लाभ देशातील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घ्यावा. असे आवाहन शिशु विकास योजनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सतीश बुच्चे व एस.एस.इंगळे जळगाव जिल्हा प्रतिनिधी यांनी केले आहे.

Protected Content