लंगडी असो.च्या अध्यक्षपदी डॉ.अस्मिता पाटील, सचिवपदी वाकलकर यांची नियुक्ती

langadi

चाळीसगाव प्रतिनिधी । लंगडी या खेळास ग्रामीण भागातून अधिकत्तम दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जिल्हास्तरीय लंगडी असोसिएशनची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा लंगडी असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.अस्मिता पाटील तर सचिवपदी राहुल वाकलकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

आज सर्वत्र देशी मैदानी खेळांचा बोलबाला असून यात कुस्ती, कबड्डी, खो-खो, मल्लखांब या खेळांचा प्रामूख्याने समावेश आढळून येतो. यात पारंपारिक ग्रामीण भागात खेळला जाणारा खेळ म्हणून “लंगडी” या खेळास अनन्यसाधारण महत्व आहे. शालेय शिक्षणातून या तासिकेतून अनेक विद्यालयात लंगडी हा खेळ प्रामुख्याने खेळविला जातो. यापूर्वीच तत्कालीन क्रिडा मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या वतीने लंगडी या खेळास शालेय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र लंगडी असोसिएशनचे सचिव चेतन पगावाड यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.

लंगडी या खेळास राष्ट्रीय स्तरावरील दर्जा प्राप्त व्हावा, तसेच ग्रामीण भागातून उदयोन्मुख खेळाडूंना वाव देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून खेळाडूंच्या सुप्त गुणांवर भर देत नावीन्यपूर्ण खेळ प्रदर्शित करण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तर राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

Protected Content