गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आज, सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आणि वंदना घेऊन झाली.

या विशेष कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. प्रियदर्शनी मून, प्रा. पियुष वाघ आणि डॉ. केतकी पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी भाषणे, कविता आणि गीते सादर केली, ज्यामुळे वातावरण भारून गेले होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या महत्त्वपूर्ण संदेशाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या महान कार्याचा गौरव करत, त्यांच्या सामाजिक योगदानाला आदराने नमन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते आणि संपूर्ण परिसरात जयंतीचा एक प्रेरणादायी आणि उत्साही माहोल निर्माण झाला होता.

Protected Content