अमळनेर येथील डॉ. कुणाल पवार आणि शरद धनगर यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी । नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. कुणाल पवार आणि शरद धनगर यांची निमंत्रितांच्या गजल मुशायऱ्यात निवड करण्यात आली आली आहे.

 

सविस्तर असे की, नाशिक येथे ३ ते ५ डिसेंबर २०२१ रोजी होऊ घातलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील डॉ. कुणाल पवार तसेच करणखेडा येथील शरद धनगर यांची निमंत्रितांच्या गझल मुशायऱ्यात निवड झाली आहे. आयोजन समितीकडून दोघांनाही संपर्क करण्यात आला असून ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता गझल मुशायऱ्याला सुरवात होणार आहे. डॉ. कुणाल पवार हे खान्देश साहित्य संघ, शाखा जळगावचे जिल्हाध्यक्ष असून ते उत्कृष्ट अहिराणी व मराठी कवी तसेच गझलकार आहेत. ते सातत्याने दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम अमळनेर शहरात घेत असतात. शरद धनगर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकार असून ते राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमात निमंत्रित असतात. गझल मुशायऱ्यात निमंत्रित झाल्याबद्दल शैक्षणिक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!