सहनशीलतेचा अंत पाहू नका – राज ठाकरे

मशिदींतील शस्त्रास्त्रे किंवा अतिरेकी शोधण्यासाठी अशी धरपकड मोहीम राबविली का?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्याची अतिरेक्यांप्रमाणे धरपकड केलीं जात आहे. तर काहीना तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत, यावरून राज ठाकरे यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा मुख्यमंत्र्यांना खुले पत्र ट्वीटर वरून ट्वीट करीत दिला आहे.

राज्य सरकारला माझं एकच सांगणे असून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असे म्हणत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी आवाहन केल्यानंतर राज्य सरकार बेभान झाल्यासारखे वागत आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलनापूर्वीच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार करण्यात आले. अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले.  ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठीच ना!

अतिरेक्यांसारखा शोध
गेल्या आठवडाभरापासून राज्य सरकार मनसेच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करीत आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकारचे पोलीस बलाचा वापर होतो आहे. संदीप देशपांडेसह अन्य कार्यकर्त्यांना पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा हैद्राबाद संस्थानचे रझाकार असल्यासारखे पोलीस त्यांना शोधात आहे.

मशिदींमध्ये शस्त्रास्त्रे, अतिरेकी शोध मोहीम कधी राबविली का? 

मशिदींमध्ये शस्त्रास्त्रे किंवा अतिरेकी शोधण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुले पत्र ट्वीट करीत जाहीर इशारा देखील दिला आहे. अत्याचार करणारे, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला कोणी दिलेत, हे सर्व मराठी, तमाम हिंदूजनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे, असे देखील या पत्रात राज ठाकरेंनी म्हटले आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!