मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गंत डोंगर कठोरा विद्यालय तालुकास्तरावर प्रथम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशोशिखरात एक मानाचा तुरा रोवत व अभिमानाने मान उंचविणारी कामगिरी करीत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यात यश मिळविले आहे. दरम्यान यानिमित्ताने काल २० जुलै शनिवार रोजी शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण गावामध्ये डीजेच्या तालावर देशभक्तीपर गीते व शालेय गीते यावर विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे दांडिया सादर करीत रॅली काढण्यात आली. प्रसंगी संपूर्ण गावामध्ये विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा तसेच ग्रामस्थांचा जल्लोष हा वाखाणण्याजोगा होता हे विशेष !.कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली. रॅली दरम्यान गावात ठिकठिकाणी व चौकाचौकात “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यात यश मिळविल्याबद्दल त्याच्या रुपरेषेची माहिती प्राचार्य नितीन झांबरे व पी.पी.कुयटे यांनी विशद करून सांगितली.

या कार्यक्रमास सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, ग्रामपंचायत सदस्या आशा आढाळे, शकीला तडवी, केंद्रप्रमुख महंमद तडवी, संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे, उपाध्यक्ष राजाराम राणे, सचिव डी.के.पाटील, खजिनदार शरद राणे, जि.प.शाळा मुख्याध्यापिका विजया पाटील, उपशिक्षक शेखर तडवी, प्रदीप पाटील, मुख्याध्यापक नितीन झांबरे, उपशिक्षक एन.व्ही. वळींकर, सचिन भंगाळे, चेतन चौधरी, विवेक कुलट, शुभांगीनी नारखेडे, सोनाली फेगडे, रामेश्वर जानकर, पी.पी.कुयटे, आर.पी.चिमणकारे, मनीषा तडवी, मोहिनी पाटील, शिक्षकेतर कर्मचारी ठकसेन राणे, योगेश पाटील, संदीप सोनवणे, मिलिंद भिरूड, पराग पाटील यांच्यासह विद्यार्थी,विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content