किनगावात एटीएम सेवा सुरळीत करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । किनगाव येथील मुख्य मार्गावरील स्टेट बँकेची एटीएम सेवा वारंवार बंद होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. स्टेट बँकेचे नियमीत बंद असणारे एटीएम मशीनची सुविधा ग्राहकांना २४ तास मिळावी, अशी मागणी स्टेटबँकेचे ग्राहक करीत आहेत.

संगणकाच्या युगात आज अतिजलद आँनलाईन सेवा जगभर होत आहेत. यात बँकिंग क्षेत्रानेही मोठी प्रगती केली. असुन इंटरनेटच्या या युगात गुगल पे व फोन पे सारख्या मोबाईल सुविधांचा वापर बहुतांशी ग्राहक करतात तर ग्राहकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी सोईचा मार्ग म्हणून बँकांच्या माध्यमातुन एटीएम मशीनही मोठ्यासंख्येत कार्यरत आहेत. जेणे करून बँकेत गर्दी होऊ नये, परंतु किनगाव तालुका यावल येथील ब-हाणपूर अंकलेश्वर राज्यमार्गालगत असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मात्र याला अपवाद आहे. कारण हे एटीएम सेवा नेहमीच बंद असते रिझर्व बँकेच्या नियमावलीनुसार एटीएमची सुवीधा ही ग्राहकांना २४ तास सेवा पुरवणे हे क्रम प्राप्त आहे, तर या सेवेबाबत ग्राहकांना बँकेच्या नियमानुसार प्रत्यक व्यवहाराला चार्जही आकारला जातो.

मात्र किनगाव स्टेट बँकेचे एटीएम नेहमी बंदच असते असे का ? एटीएम मशीन कार्यरत असतांना बँकेचे आधीकारी याचा उपभोग ग्राहकांना का घेऊ देत नाहीत ? दुसरीकडे कोरोना या महाभयंकर महामारीमुळे आपआपसात सुरक्षीत अंतर ठेवणे महत्वाचे असतांना मात्र किनगाव येथे स्टेट बँकेचे एटीएम नियमीत बंद असल्याने ग्राहकांना आपला जिव धोक्यात टाकुन नाईलाजाने बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागते. मात्र आतापर्यंत कोणत्याही अधीका-याने ग्राहकांच्या समस्या समजुन घेतल्या नाहीत म्हणून किनगावसह परीसरातील स्टेटबँकेच्या ग्राहकांनमध्ये नाराजी आहे समजा रात्री बे रात्री जर एखाद्या ग्राहकाला आरोग्याच्या कामासाठी पैसे लागत असले तर त्याचे काय ? या गोष्टीनकडे किनगाव स्टेट बँकेचे अधीकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष तर करीत नाहीत ना ? कारण काही तांत्रीक कारणामुळे एटीएम मशीन बंद असले तर ते दोन किंवा चार दिवस बंद असू शकते .

व एटीएम मशीन बंद असल्याचा बोर्डही बँका लावतात मात्र किनगाव स्टेटबँकेचे एटीएम मशीन हे नेहमी बंद असल्यामुळे व हे मशीन कोणत्या कारणामुळे बंद आहे हेही ग्राहकांना समजत नाही कारण येथे कोणत्या कारणामुळे मशीन नेहमी बंद असते असा कोणताही बोर्ड बँकेने लावलेला नाही म्हणून बँकेचे अधीकारी आपली मनमानी चालवतात की काय असा प्रश्नही ग्राहकांना पडला आहे.सध्या सनासुदीचे दिवस असल्याने ग्राहकांना नगद पैशांची आवश्यकता असते म्हणून ते एटीएम मशीनवर जातात परंतू किनगाव येथील एटीएम मशीन हे नियमीत बंद असल्याने त्यांना यावल किंवा जळगावला जाऊन एटीएम मधुन पैसे काढावे लागतात मग किनगाव येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फक्त शोपीसच आहे की काय? आणी जर बँकेला एटीएम मशीन वापरात आणायचेच नव्हते तर मग ग्राहकांना एटीएम कार्ड दिलेच कश्याला ? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत किनगाव हे परीसरातील १५ ते २० गावांना जोडणारे बाजारपेठेचे गाव आहे.

केळी व भुसार मालाचे व्यापारी आहेत अर्थातच स्टेटबँकेच्या एटीएम वर मोठ्या प्रमाणात आर्थीक व्यवहार होतात म्हणूनच ग्राहकांना एटीएम मशीनची सेवा मिळावी, या उद्देशानाच येथे एटीएममशीन बसवण्यात आले आहे. मात्र ते नियमीत बंदच असल्याने ग्राहकांनमध्ये नाराजी आहे. तर स्टेटबँकेचे वरिष्ठ आधिकारी यांनी किनगाव येथील नेहमी बंद असणा-या एटीएम मशीनबाबच्या व ग्राहकांच्या होणाऱ्‍या गैरसोयीचा विचार करावा व किनगाव स्टेट बँकेचे नियमीत बंद असणारे एटीएम मशीनची सुविधा ग्राहकांना २४ तास मिळावी, अशी मागणी स्टेटबँकेचे ग्राहक करीत आहेत.

 

 

 

 

Protected Content