सर्वसामान्यांना दंड तर अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष : जामनेरातील प्रकार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस प्रशासनातर्फे सर्वसामान्य वाहनधारकांवर कारवाई करून दंड ठोठावण्यात येत असला तरी अवैध वाहतुकीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

 

जामनेर शहरातील पोलीस स्टेशन समोर पोलीस  सर्व सामान्य वाहनधारकांना नियमाच्या खाली अडवणूक करून कारवाई करीत आहे मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर शहरा सह तालुक्यात अवैध वाहतूक सुरू असताना त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल सर्वसामान्यांना पडत आहे.

 

शहरामध्ये तालुक्याभरातून सर्वसामान्य नागरिक हे कामानिमित्त येत असतात. शहरातील भुसावळ चौफुलीवर पोलीस स्टेशन समोर जामनेर पोलीस हे बॅरिकेट लावून सर्वसामान्य दुचाकी  चारचाकी वाहकधारकांना बॅरिकेट लावून थांबवून विविध वाहतुकीचे नियम दाखवतात.  वाहतुकीच्या नियमाप्रमाणे दस्तावेज नसले त्यांच्यावर  कारवाई करून दंड वसूल करीत आहेत. मात्र दुसरीकडे जामनेर शहरासह तालुक्यात अपेरिक्षा सह अनेक अवैध प्रवासी वाहतूक  सुरू असतांनाही या वाहनावर कोणत्याही प्रकारची कारवाई जामनेर पोलीस करीत नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 

यामुळे तालुक्यातील अवैध वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष जामनेर पोलीस करताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सर्व सामान्य वाहनधारकावर कारवाई करून जामनेर पोलीस काय सिद्ध करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे संबंधित विषयाकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी शहर वासिया कडून करण्यात येत आहे.

Protected Content