पहूर येथे डॉक्टर तरूणीची आत्महत्या

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । आई -वडील विवाहासाठी बघीतलेल्या  मुलाला होकार कळविण्यासाठी गेले असताना घरी कोणीही नसल्याचे पाहून डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथील आज दुपारी घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषीमातानगर मधील रहिवासी शामराव नामदेव सावळे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी प्रतिभा श्यामराव  सावळे ( २३ वर्षे ) हीच्या विवाह संबंधी बोलणीकरण्यासाठी ते पत्नी, मुलगा शुभम व मुलगी स्नेहल यांच्यासह जवाहर जिल्हा पालघर येथे गेले होते. दरम्यान डॉ. प्रतिभा घरी एकटीच होती. शेजारीच राहणाऱ्या काकांकडे तिने दुपारी १ वाजेच्या सुमारास जेवण करून आपल्या घरी आली. तीचे काका रामराव सावळे हे शेतातून घरी आल्यावर डॉक्टर प्रतिभाचा फोटो आणण्यासाठी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी मुख्य दरवाजा ठोठावला. मात्र घरातून प्रतिसाद आला नाही. त्यांनी लहान मुलीला घरात जाण्यासाठी लहान जागा आहे.

 तिथून पाठवले असता डॉ. प्रतिभाने गळफास गेले घेतला असल्याचे तिने सांगितले. दरवाजा उघडून आत मध्ये डॉक्टर प्रतिभा भिंती जवळील छतास असलेल्या कडीला ओढणी बांधून जीवन यात्रा संपल्याचे आढळून आले. यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने पोलिसांच्या समक्षमृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिला मृत घोषित केले. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याप्रकरणी रामराव नामदेव सावळे (भाऊ ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Protected Content