विश्व मानव रूहानी केंद्राकडून ब्लँकेट वितरण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम परिसरात राहात असलेल्या विविध वस्ती आणि पाड्यावर आदिवासी बांधवांना विश्व मानव रूहानी केंद्र नवांनगर यांच्या वतीने ब्लँकेट वितरीत करण्यात आले. 

हा उपक्रम केंद्राच्या भुसावळ, यावल, जामनेर व रावेर येथील भक्तांनी एकत्र येवुन राबवला. शंभरहुन अधिक कुटुंबांना सन्मानाने त्यांच्या वस्तीवर कांबळ (ब्लँकेट) वितरीत करण्यात आले.

महाराष्ट्रातील साक्री तालुका व पिपंळनेर तालुका येथे मोठे मानव केंद्र आहे. या मानव केंद्राच्या विश्व मानव रूहानी केंद्र नवांनगर शाखा भुसावळ यांच्या वीतने सातपुड्याच्या कुशीत आदिवासी बांधवांना कांबळ (ब्लँकेट) वाटप करण्यात आले होते. यात तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी पाडे यात पाढरीवस्ती, नागादेवी, रावेर तालुक्यातील मोहमाण्डली, जामनेर तालुक्यातील एकलव्य वस्ती या ठिकाणी आदिवासी भागात गरजू गोरगरीब व्यक्तिंना कांबळ (ब्लँकेट) सन्मानाने वितरण करण्यात आलीत. विश्व मानव रूहानी केंद्रच्या वतीने कोरोना विषाणुच्या या जागतिक महामारी मध्ये देखील गोरगरीब, गरजुंना संकटाच्या काळात जिवनावश्यक रेशनसाहित्य, मेडिकल, फूड पैकेट कडून वाटप करण्यात आले होते. भुसावळ, यावल, जामनेर व रावेर येथील सतसंग केन्द्राने संयुक्त परिश्रम घेत राबविलेल्या या सामाजीक उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

सर्वत्र सेवा भाव  भारतामध्ये एकूण ३५० मिशन असून सर्व मिशन द्वारे नेहमी सेवाभावी कार्यक्रम घेऊन संतसंग गरजू लोकांपर्यंत पोहचत असते.

Protected Content