दोन दुकाने फोडून सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबविला; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बी.जे. मार्केट परिसरातील दोन दुकानांच्या शटरचे कुलपू तोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे.  चोरट्यांनी रोकडसह सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा डीव्हीआर चोरुन नेला.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नयरपार्क विजय कॉलनी येथील प्रसन्न रमेशलाल जैन हे शहरातील बालगंधर्व नाट्यगृहाजवळ महेश लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे प्रतिक एजन्सी नावाने दुकानात मॅनेजर म्हणून नोकरी करतात. याठिकाणाहून पारले बिस्कीट व ङ्गॉर्चुन ऑईलची ठोक विक्री केली जाते. शनिवारी २ जुलै रोजी दुकानात माल विक्री करुन जमा झालेली रोकड टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून सर्व कर्मचारी घरी गेले. दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने एजन्सी उघडलेली नव्हती. दरम्यान, सोमवारी ४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मॅनेजर प्रसन्न जैन हे सेल्समन रविंद्र मुरलीधर कासार यांच्यासोबत एजन्सी उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाला लावलेली कुलूप तुटलेले व दुकानाचे शटर उचकाविलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच प्रतिक एजन्सीजत चोरी केल्यानंतर चोरट्यांनी बी. जे. मार्केटमधील सस्टेनेबल ऍग्रो कमर्शियल फायनान्स लिमिटेड कंपनी या दुकानांचे शटर उचकावून चोरी झाल्याची खात्री झाली. याठिकाणाहून चोरट्यांनी डीव्हीआर, राऊटर, एचपी नेटवर्क स्विच व नेटवर्क कनेक्टर असा एकूण ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचे जनरल मॅनेजर नितीन मधुकर पाटील रा. रायसोनी नगर मोहाडी रोड यांच्या तक्रार दिली.

 

चोरटे सीसीटीव्हीत कैद

पोलिसांसह मॅनेजर यांनी दुकानात जावून पाहणी केली असता, त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोकड दिसून आली नाही. तसेच ताहेरी ट्रान्सपोर्टमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे ङ्गुटेज चेक केले असता, त्यांना फुटेज दिसून आली नाहीत. केवळ यात ४ रोजी पहाटे ४ ते ५ या वेळेत दोन इसम मोटारसायलीवर येवून त्यांनी चोरी केल्याचे कैद झाले आहेत. त्यांनी दुकानातून १ लाख ५७ हजारांची रोकड व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा डीव्हीआर असा एकूण १ लाख ६७ हजार ९६७ रुपयांचा ऐवज लांबविला.

Protected Content