जळगावात चोरट्यांनी मेडीकल दुकान फोडले

sambhaji nagar chori

जळगाव प्रतिनिधी । गुरूकुल कॉलनीतील मेडीकल दुकान अज्ञात चोरट्याने फोडून टेबल्याच्या ड्राव्हरमधील अडीच हजार रूपये रोख चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त विठ्ठल भगवानदा शहा (वय-76) रा. गुरूकुल कॉलनी, एम.जे.कॉलेजजवळ यांचे राहत्या घराच्या खाली विवेकांनद मेडीकल नावाचे दुकान आहे. सेवानिवृत्त असल्याने दुकानाचे कामकाज व देखभाल स्वत: विठ्ठल शहा व सोबत मदतनिस म्हणून सुभान पिंजारी हे करतात. शनिवारी 24 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. तर दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने दुकान बंद होते व रात्री उशीरापर्यंत दुकानाला कुलूप व्यवस्थीत असल्याचे पाहिले होते.. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता दुकान उघडण्यासाठी बघितले असता दुकानाचे कुलूप तोडलेले आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले 2 हजार 850 रूपये रोख चोरून नेले. याप्रकरणी विठ्ठल शहा यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विनोद शिंदे करीत आहे.

Protected Content