शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी कार्यालयासमोर घोषणाबाजी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते तसेच सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या निवृत्तीच्या निर्णयावर जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी दु:ख व्यक्त करत साहेबांनी निर्णय मागे घ्यावा, नाहीतर जळगाव जिल्ह्यातील सर्व नेते राजीनामा देतील यासाठी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कार्यालयासमोर मंगळवारी २ मे रोजी सांयकाळी ५ वाजता शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद पवार यांनी राजकीय आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि निर्णयाला विरोध करण्यात आला. त्यानंतर शरद पवारयांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध जोरदार केला. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांनी आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयासमोर शरद पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवारांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेतेदेखील भावूक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर, महिला पदाधिकारी मंगला पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, विनोद देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content