असमान निधी योजनेंतर्गत विविध योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या असमान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वागीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येत असून इच्छुकांनी प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी केले आहे. 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वागीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. या असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन 2020-21 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना http://www. rrrlf. gov. in  या प्रतिष्ठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन download करुन घ्यावा. असे आवाहन ग्रंथालय संचालक, शा. गो. इंगोले यांनी केले आहे. 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमुना सुधारित स्वरुपात असावा. अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालयास दि. 8 जानेवारी, 2021 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन ग्रथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी केले आहे.

 

 

Protected Content