खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेत “पोस्टर सादरीकरण स्पर्धा” उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली.

 

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उदघाटन प्रा. विनोद चौधरी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बोडवद यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत भारतीय संस्कृती, भारताचे नवीन शैक्षणिक धोरण, भारताच्या विविध जातीजमाती, वेद उपनिषद, पुराण, भारतीय योग परंपरा, पर्यावरण, पशू संवर्धन दशविद्या, अष्टविनायक, भारतीय योग परंपरा, डिजिटल शिक्षण, आत्मनिर्भर भारत, योग अशा विविध विषयावरील पोस्टरचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले.

 

स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून तीन विजेत्यांची निवड करून पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात पर्यावरण  ‘संवर्धन आणि वन्य जीवन’ या विषयांवर प्राजक्ता नंदकुमार अग्निहोत्री व मोनिका रमेश सोळंके (कबचौ उमवि, जळगांव) यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पोस्टर साठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून द्वितीय क्रमांक डिजिटल शिक्षण या विषयासाठी शेख आफरीन आणि स्वप्निल पाटील (कबचौ उमवि, जळगांव) यांना देण्यात आला तर तृतीय पुरस्कार भारतीय योग परंपरा या विषयासाठी स्नेहा अरुण सोनार आणि रिनी नाथ (कबचौ उमवि, जळगांव) यांना प्रदान करण्यात आला.

 

स्पर्धेस परीक्षक म्हणून जे.डी.एम.व्ही.पी संस्थेचे प्रा.डॉ. अविनाश बडगुजर आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अनिल बारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्पर्धेच्या समारोप सत्रात प्रा.डॉ.सुनील कुळकर्णी, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या व विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रशासन अधिकारी, प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.हितेश ब्रिजवासी यांनी प्रयत्न केले. यासाठी हितेंद्र सरोदे, श्री.मुरलीधर चौधरी, डॉ.संतोष बडगुजर, डॉ. वैजयंती चौधरी, आशा पाटील,  कल्पना पाटील, सुनील बारी आदींनी सहकार्य केले तर महविद्यालीचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content