ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानास प्रारंभ

jamner news

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर येथे आज ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बालिका प्रतिज्ञा सर्व बालिका कडून घेण्यात आली.शिवाजीनगर परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी घोष वाक्यांनी सर्व परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.सोनवणे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील बालिका यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.नंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व नाटिका सादर केली. शिक्षक मनोगत मध्ये विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती एम.आर.भारंबे यांनी केले आर.जे.सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. सूत्रसंचलन वैष्णवी शिंदे आणि वर्षा जोशी यांनी केले. तर प्रास्ताविक एस.व्ही.पाटील यांनी केले. आभार एस.आर पाटील मॅडम यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content