नाचणखेड्यातील बारा जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह

पहूर, ता .जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नाचणखेडा येथील १२ जणांच्या स्वॅब तपासणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे परिसरातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

नाचणखेडा येथे लाखोली परिसरात राहणार्‍या बाजारात डाळी वगैरे विकून उपजीविका करणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील १२ नातेवाईकांचे स्वॅब तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याची माहिती नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ . हर्षल चांदा यांनी दिली. यामुळे पहूर परिसरातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
नाचणखेडा येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती . प्रशासनाने तत्काळ लाखोली परिसर प्रतिबंधित करून निर्जंतुक केला होता. तसेच रुग्णाच्या कुटुंबातील बारा जणांचे स्वॅब घेतले होते. आज त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पहूर येथील महावीर पब्लिक स्कूल येथील कोवीड केअर सेंटर मधून त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. पाळधी येथीलही एक अहवाल काल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, परिसरातील लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Protected Content