यावल तालुक्यात तीन नवीन कोरोना बाधीत; शहरासह भालोदमधील रूग्णांचा समावेश

यावल प्रातिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील दोन तर भालोद येथील एका रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला असून संबंधीत व्यक्तींच्या रहिवासाच्या परिसराला कंटेनमेंट म्हणून घोषीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोरोना संसर्गाचा तालुक्यात प्रादुर्भाव सातत्याने वाढत असुन आज पुन्हा तिन रुग्ण हे कोरोना पॉझीटीव्ह आल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असुन तालुक्यात आज पर्यंत कोरोना संसर्ग बाधीत रुग्णांचा आकडा ४१वर पहोचला आहे. आज दिनांक ६ जुन रोजी देखील शहरातील तिरुपती नगर मध्ये राहणारे आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयातील एक अधिकारी व मेन रोडवरील कापड व्यवसायीक असे दोन रूग्ण तर तालुक्यातील भालोद येथे एक असे एकुण तिन रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह मिळुन आल्याने आता बाधीत रुग्णांची संख्या ४१वर पहोचली आहे.

दरम्यान, संबंधीत रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रांत आधिकारी डॉ अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मानिषा महाजन , पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी आपली प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तर यावल शहरातील दोन डॉक्टर्सचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

Protected Content