उद्या युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे उद्या शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त  छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल येथे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने  कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये जळगाव जिल्ह्यातून १५ मुलांचे तर  ४ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.  आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून खेळाडूंना सरावासाठी व खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी याप्रकारच्या स्पर्धा महत्तवाच्या असल्याचे मत युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी मांडले.

स्पर्धेचे उदघाटन सकाळी १० वाजता होणार असून मुख्य अतिथी म्हणून शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख तथा श्री. सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष संजय सावंत, युवासेना कार्यकारीणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शितल देवरूखकर-शेठ, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ. दिनेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक अरूण धनावडे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, गट नेते अनंत जोशी, जिल्हा संघटक गजानन मालपूरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Protected Content