आर. सी. बाफना ज्वेलर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबविल्या ; चोरट्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हीडीओ)

rc bafana chori

जळगाव (प्रतिनिधी) येथील सराफ बाजारातील प्रसिद्ध आरसी बाफना ज्वेलर्समधून तीन अज्ञात चोरट्या महिलांनी तब्बल अडीच लाखाच्या सोन्याच्या बांगड्या हात चलाखीने लांबविल्या आहेत. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या संदर्भात आज पोलिसात तक्रार देण्यात असून चोरट्या महिला बांगड्या लांबवितांना सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

 

 

या संदर्भात अधिक असे की, दी.२० एप्रिल शनिवार रोजी दुपारी साधारण साडेतीन वाजेच्या सुमारास तीन महिला सोन्याच्या बांगड्या घेण्याच्या निमित्ताने दुकानात आल्या. त्यांना सेल्समन धीरज शांतीलाल जैन यांनी विविध बांगड्या दाखविल्या. थोड्यावेळाने त्या महिला दुकानातून निघून गेल्यात. त्यानंतर रात्री नेहमी प्रमाणे विकलेला माल आणि उरलेला मालच्या स्टाॅकची माहिती लिहित असतांना सेल्समन धीरज जैन यांना चार बांगड्या कमी आढळून आल्या. मॅनेजर निलेश जैन यांनी देखील स्टाॅक केला.परंतु त्यांना देखील बांगड्या कमीच मिळून आल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही तपासले. त्यात दुपारी ३ वाजून २२ मिनिट ते ३ वाजून ३६ मिनिटच्या दरम्यान, तीन महिला हात चलाखीने बांगड्या चोरतांना दिसून आल्या. या संदर्भात सेल्समन धीरज जैन यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  दिनेशसिंग पाटील करीत आहे.

Add Comment

Protected Content