वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियान; मतदान करणाऱ्यांना फीमध्ये ५० टक्के सवलत

Paatil Bhusawal

वरणगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि अॅड.डॉ.नि. तु. पाटील यांनी मतदार जनजागृती अभियान रावबणार आहे.

 

मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्रतापासाणीत ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. २३ एप्रिलला मतदान केल्यानंतर हे अभियान दि.२३ ते ३० एप्रिल वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. याआधीही डॉ.पाटील दाम्पत्याने विधानसभा,जिल्हया परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद ,ग्रामपंचायत निवडणुकीत असा उपक्रम राबयून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला होता. लोकशाहीच्या बळकटीसाठी 100 टक्के मतदान होते गरजेचे आहे. शासन,प्रशासन, सेवाभावीसामाजिक संस्था यासाठी जनजागृती करत आहे. याला आपला हातभार लावावा म्हणून डॉ.पाटील दाम्पत्याने सदर उपक्रम आयोजीत केला आहे. मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास या सवलतीचा फायदा घेता येणार आहे.लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यावर मतदारांना याचा फायदा होणार आहे.

 

प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य दि.२३ एप्रिल मंगळवार रोजी राबवावे.मतदाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून दि.२३ ते ३० एप्रिल या काळात मतदारांना नेत्र तपासणी शुल्कात ५० टक्के सूट मिळणार आहे. आपली सामाजिक बांधिलकी जोपासत सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक आहे,याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अॅड.डॉ.नि.तु. पाटील यांनी केले आहे.

One Response

  1. Dr Nilesh Tukaram Patil

Add Comment

Protected Content