Home Cities जळगाव काँग्रेस कडून “व्यर्थ न हो बलीदान”अभियान : उद्या फैजपूर येथे...

काँग्रेस कडून “व्यर्थ न हो बलीदान”अभियान : उद्या फैजपूर येथे कार्यक्रम

0
45

जळगाव, प्रतिनिधी  । १५ ऑगस्ट २०२१ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षात पदार्पणकरीत असल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी कडून “व्यर्थ न हो बलीदान”अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने उद्या शनिवार दि. ७ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत फैजपूर येथे छायाचित्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून तरूणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा, स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखीत व्हावा,काँग्रेस जन जनात, भारतीय काँग्रेसचे स्वतंत्र लढ्यातील योगदान, या उद्देशाने ‘व्यर्थ न हो बलीदान’ हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अनुषंगाने उद्या दि ७ रोजी सकाळी १० वाजता फैजपूर येथे छायाचित्र कार्यक्रम, आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर,आदिवासी मंत्री के सी पाडवी, उत्तर महाराष्ट्र सहप्रभारी वामशी रेड्डी,कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे,आ. कुणाल पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी उपस्थिती चे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound