Home Cities जळगाव श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजावनी समाधी सोहळा संपन्न

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजावनी समाधी सोहळा संपन्न

0
53

जळगाव, प्रतिनिधी  । श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७१ संजीवन समाधी (पुण्यतिथी सोहळा ) सोहळा शिंपी समाज मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.

 

जळगाव येथील श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थाचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि. ६ ऑगस्ट  रोजी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी सकाळी साडेनऊ वाजता संपन्न झाला.  सर्वप्रथम संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मूर्ती पूजन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तसेच जिल्हा सचिव प्रशांत कापुरे सपत्नीक यांनी केले. मल्याअर्पण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिलीप शिंपी यांनी केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव चंद्रकांत जगताप, कोषाध्यक्ष संजय  जगताप, सहसचिव दीपक जगताप यांनी नामदेव महाराज प्रतिमेला अभिवादन केले. याप्रसंगी समाजाचे माजी अध्यक्ष रामकृष्ण टेकचंद शिंपी, मुकुंदराव मेटकर, शिवाजी शिंपी, सुरेश सोनवणे, सतीश जगताप, सतीश पवार, शरद बिरारी आणि राजेंद्र बाविस्कर यांनी आरती केली.   जिल्हा उपाध्यक्ष अनिल खैरनार, दत्तात्रेय वारुळे, शैलेंद्र सोनवणे, प्रदीप शिंपी, नथू काका शिंपी, जितेंद्र शिंपी, दिलीप भामरे,  गणेश सोनवणे, चेतन खैरनार ,चेतन शिंपी, प्रमोद कापुरे, निलेश कापुरे, मोहन सोनवणे, नितीन सोनवणे, एकनाथ बाविस्कर, सुजित जाधव, संजय निकम, जिल्हा युवक अध्यक्षपदी परेश जगताप, कांचन नगर शाखा प्रमुख नाना कापणे यांनी केले. तसेच महिला मंडळाकडून सुद्धा प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यात संस्थेचे महिला अध्यक्ष रेखाताई निकुंभ, आशाताई जगताप, आरतीताई शिंपी, मनीषा कापू,रे वंदनाताई जगताप, सौ बागुलताई यांचे सर्वांचे सहकार्य लाभले.

 


Protected Content

Play sound