चोपड्यातील कुंटणखान्यावर धाड : तरूणी सुधारगृहात

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकून तरूणींची सुटका करत त्यांची सुधारगृहात रवानगी केली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, चोपडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात नगरपालिकेच्या मागील बाजूला कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार सहायक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यात ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामधील सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३४ तरूणींना जळगाव येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

या छाप्यात आढळून आलेल्या बहुतांश तरूणी या परप्रांतीय असल्याचे आढळून आले आहेत. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content