पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांच्या खरेदी – विक्रीस बंदी

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे दर रविवारी बैल बाजार भरविला जातो. परंतु, जनावरांवर लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोणीही जनावरे विकण्यास आणू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशी कारवाई करण्यात येईल असे  पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी आवाहन केले आहे.

 

 

राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्तक झालं आहे. हा आजार फैलावू नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात प्रशासनानं जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जनावरांची ने आण करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत अनिश्चित काळासाठी गुरांचा बाजार न भरवण्याचे तसेच जनावारांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  तरी कोणीही पारोळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत आपले बैल, गाई, वासरे विकण्यास आणू नये. जर कोणीही बैल बाजारात  किंवा इतर कोणतेही ठिकाणी जनावरे विकण्यास आणल्यास त्या सर्वांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्यात येणार आहे. म्हणून कोणीही कोठेही जनावरांचा बाजार भरविण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केलेले आहे.

 

Protected Content