धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकली उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे नुकतीच करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी तातडीने दिव्यांगांना सायकली उपलब्ध करून त्यांचे आज वाटप केले.
शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांना सांगून सायकली उपलब्ध करून दिल्या. १० जून रोजी ८० टक्के दिव्यांग असलेल्या कमालुद्दीन मोमीन व रामकृष्ण पाटील या दोन दिव्यांगांना शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या. सायकली मिळाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये समाधान दिसत होते.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, दिव्यांग तालुकाध्यक्ष दिव्यांग संजय पाटील, रवी काबरा, अक्षय नगरसेवक नंदू पाटील, योगेश पाटील, हाजी मोहम्मद मोहीन सय्यद भारती पारधी, नारायण बयस, संजय चौधरी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.