बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

box cricket leage

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील खान्देश सेन्ट्रल मॉलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत ‘सनराईज ऑरेंज’ हा संघ विजयी तर ‘येलो सुपर किंग’ हा संघ उपविजयी ठरला आहे. या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ओम गृप हे होते.

 

या स्पर्धेला शहरातील अनेक मान्यवर व्यावसायिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. जळगाव इंटेरीअर डिझाईनर असो.चे अध्यक्ष राजेश शर्मा, तांत्रिक सल्लागार निलेश कोगटा, कार्यक्रम पदाधिकारी दिनेश बाफना, कल्पेंद्र शर्मा, स्वप्निल शिरुडे, चेतन संघवी, मनोज पित्रोदा, मुकेश तोष्णीवाल, सचिन कापडे, राहुल शर्मा आणि राहुल पवार यांनी स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केले.

Protected Content