आयपीएल २०२०च्या लिलावामधून बांगलादेशी खेळाडूंची माघार

Mushfiqur with Shakib Bangladeshi players

मुंबई वृत्तसंस्था । बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने आगामी आयपीएल २०२०च्या लिलावातून माघार घेतली आहे. मात्र चांगल्या फॉर्मात असतानाही, मुश्फिकुरने लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटक्षेत्रात चांगलाच चर्चा रंगू लागल्या आहेत. येत्या १९ डिसेंबरला कोलकाता येथे आयपीएल २०२०चा लिलाव होणार आहे.

नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत मुश्फिकुरने चांगली कामगिरी केली होती. दौऱ्यात बांगलादेशला एकमेव सामन्यात यश मिळालं, दिल्ली टी-२० सामन्यात संघाच्या विजयातही मुश्फिकुरचा मोलाचा वाटा होता. कसोटी मालिकेतही मुश्फिकुरनेच बांगलादेशकडून एकाकी झुंज दिली होती. मुश्फिकुरने लिलावाच्या प्रक्रियेतून माघार घेतली असली, तरीही मेहमद्दुल्ला, मेहदी हसन मिर्झा, मुस्तफिजूर रेहमान, सौम्या सरकार, तमिम इक्बाल आणि तस्कीन अहमद या खेळाडूंनी लिलावात सहभागी होण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आगामी लिलावात कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Protected Content