जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात बेरोजगारी झालेल्या गरीब व गरजू व्यक्तींना जिल्हा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पिंप्राळा हुडको येथे जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
पिंप्राळा हुडको परिसरात किराणा दुकान चालविणारे अलीम शेख किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. सध्या रमजानच्या पवित्र महिना सुरू आहे. आपल्या उत्पन्नापैकी अडीच टक्के गोरगरीबांना मदत व्हावी या उद्देशाने मुस्लिम बांधव जकात देतात. अलिम भाई दरवर्षी देत असतात. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेकांचे रोजगार धंदे बंद पडले आहे. त्यामुळे एका वेळच्या जेवणाची सुविधा होत नाही. त्यांनी गेल्यावर्षी ४०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. याहीवर्षी त्यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरजूंना किराणा वस्तूचे वाटपाला सुरूवात केली आहे. अलीम शेख यांनी आज शुक्रवारी ३० एप्रिल रोजी सकाळी पिंप्राळा हुडको परिसरात गरीब गरजूंना १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. यात अनाथ, दिव्यांग, गरीब व विधवा यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले . त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.