भुसावळात मॉर्डन रोडवरील मोबाईल आणि कापड दुकानात चोरी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मॉर्डन रोडवरील मोबाईल शॉप व जनरल स्टोअर्स दुकानाचा पत्रा कापून चोरट्यांनी दुकानातील अंदाजे ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आली. 

सविस्तर वृत्त असे की, २८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मॉर्डन रोडवरील पाटील एंटरप्रायजेस मोबाईल शॉपी मधून ५०० रुपयांची चील्लर, ८ ते १० मोबाईल, त्यात दोन महागडे मोबाईल, ४ मेमरिकार्ड, ३ पॅनड्राव्ह ,५० हेडफोन, १० चार्जर, २ मार्ट वॉच तर हरी सत्यनारायण रेडिमेड अँड जनरल स्टोअर्स मधून १५ हजार रुपये रोख , ५ हजार रुपयांची चिल्लर, लहान मुलांचे कपडे असे अंदाजे २५ हजार रुपये असे एकूण ४० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून दुकान मालकाच्या संमती वाचून अनधिकृत आत प्रवेश करून रात्रीच्या वेळेस रक्कम व मुद्देमाल लांबविला.

पोलीस प्रशासनाने काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना शहरातील गस्त करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी केले असून व्यापारी पोलीस मित्राचे काम करीत असतांना चोरट्यांनी हात सफाई केल्याने जणू पोलीस व व्यापाऱ्यांसमोर आव्हान उभे असल्याचे दिसत आहे. रात्रीची गस्त वाढवून सुद्धा शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून पोलीस प्रशासन कुठे तरी कमी पडत असल्याचे दिसत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.