हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने मोटारसायकल रॅली (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी तसेच हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठीशुक्रवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील नेहरू पुतळा चौकातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

मोटारसायकल रॅलीतून हिंदू राष्ट्र जागृती सभेविषयी जागृती निर्माण करण्यात आली. हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी तसेच हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थ मैदान येथे हिंदू राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

या अनुषंगाने शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नेहरू पुतळा येथून मोटारसायकल रॅलीला सुरूवात करण्यात आली. प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात धर्मध्वजाचे पूजन करून आणि मोटारसायकल रॅलीत सहभागी झालेल्या तरूण व तरूणींवर फुलांची उधळण करून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील नेहरू पुतळा येथून “एकही नारा एकही नाम… जय श्रीराम जय श्रीराम”च्या घोषणांनी मोटारसायकल रॅलीला सुरूवात करण्यात आली. ही रॅली शहरातील नेहरू पुतळा चौक, शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक चौक, काव्यरत्नावली चौक, मु.जे. महाविद्यालय, प्रभात चौक, गणेश कॉलनी अशा विविध भागातून काढून शहरातील जी.एस. मैदान येथे रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत महिलांसह पुरूषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या रॅलीत वाहन फेरीत २५० वाहनधारक सहभागी झाले होते.

Protected Content