आ. चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगावकरांसाठी मोफत रुग्णवाहिका

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आ. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावातील जनतेच्या सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आय.सी.यु व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात थैमान घातले आहे. मृत्यू दरात हि झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गंभीर रूग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेला अवाजवी दरात पैसे मोजावे लागतात. रुग्णवाहिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नसेल तर अनेक रूग्णांची आरध्या रस्त्यातच प्राणज्योत मावळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी नागरिकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक मोफत आय.सी.यु व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका येथील ‘अंत्योदय’ जनसेवा कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे. याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. सदर रुग्णवाहिका हि तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत सेवा बजावणार आहे. नागरिकांना रुग्णवाहिकेशी संपर्क साधता यावा यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. मो. 9119555544, 9923555544 या संपर्क क्रमांकावर केव्हाही फोन करून सेवा घेता येणार आहे.

 

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.