जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान जळगाव विभाग तर्फे प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गोरगरीब मुलांना फराळ व फळे वाटप करण्यात आली.
शहरातील पांजरपोळ गौशाळेत गौमातांना केळी खाऊ घालून प्रार्थना करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यावेळी जिल्हा प्रमुख गजानन माळी, दिपक दाभाडे, अशोक शिंदे, पंकज कोळी, राज परदेशी, नरेंद्र सोनवणे, उमेश सोनवणे, कृष्णा पानसंबळ, विजय घुगे, प्रशांत राजपूत यासह युवा सहकारी उपस्थित होते.