…तर मुख्यमंत्र्यांच्या शेजारी ठाण मांडून आरक्षणाचा प्रश्न सोडवला असता – जितेंद्र आव्हाड

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । “ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवर आधारित असून ते जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करुन घेतले असते.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून दुसरीकडे मध्य प्रदेशचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास परवानगी दिली आहे.

 

दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं. “ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करुन घेतले असते. ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय असून त्यावर राजकारण करणे ही आपली प्रगल्भता नाही हे दर्शवते. प्रगल्भता असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सर्व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Protected Content