यावल परिसरातील शाळांना संगणक वाटप

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे’ यांचेतर्फे भारत विद्यालय, न्हावी, येथे यावल परिसरातील शाळांना संगणक वाटप करण्यात आले.

‘एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन असोसिएशन’ (ईसीए), पुणे यांचे सहकार्याने ‘मास्टर कार्ड इंडिया’ यांचेकडून २०० रुपये प्रतिसंगणक हाताळणी फी भरून उपलब्ध झाले आहेत. हे संगणक आवश्यक ती तपासणी व रिफर्बिशिंग करुन व ओएस अपलोड काही शालेय संस्थांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

यात यावल तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल भालोद, भारत विद्यालय, न्हावी, रावेर तालुक्यातील प्रगती विद्यालय रोझोदा, शिवाजी हायस्कूल, खानापूर आणि थोरगव्हाण येथील प्रियंका झोपे यांना संगणक देण्यात आले आहे.

याविषयी बोलतांना पुरुषोत्तम पिंपळे यांनी, “विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, परिसरात डिजिटल साक्षरता वाढावी यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे संगणक देण्यात येत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “प्रियांका झोपे यांना प्रायोगिक तत्वावर वैयक्तिकरित्या हे संगणक देण्यात आले आहेत. यातून त्यांनी गाव आणि परिसरातील विद्यार्थी व शेतकरी अशा दोन्ही वर्गास उपयुक्त सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सर्व लाभार्थ्यांनी या संगणक वापरामुळे झालेल्या फायद्याविषयी दर सहा महिन्यांनी एकदा मंडळास कळवायचे आहे. संगणक वापराच्या अन्य अटी सर्व लाभार्थ्यांना लिखित स्वरूपात देण्यात आल्या आहेत. त्यांचे सर्वांनी पालन करायचे असल्या’चे सांगत जळगांव जिल्ह्यात ८० संगणक देण्यात येत असून यासह यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा, नाशिक, पुणे, सोलापूर आणि गडहिंग्लज या जिल्ह्यातील एकूण २८ शाळा / संस्थांना हे संगणक वाटप केले जाणार असल्याचे श्री. पिंपळे यांनी सांगितले.

यासह “मंडळाच्या साप्ताहिक मूल्य शिक्षण वर्ग व ग्रामीण शालेय गुणवत्ता सुधार उपक्रमांची माहिती दिली. सर्वांनी जास्तीत जास्त मुलांना ऑनलाईन मूल्य शिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी प्रचार व प्रसार करावा’’ असे आवाहन केले.

उपक्रमाच्या सुरुवातीला भारत विद्यालय न्हावी यांचेतर्फे सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपक्रमास लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर पुणे येथील पुरुषोत्तम पिंपळे, लेवा शुभमंगल भालोदचे प्रमुख हर्षल जावळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे (भारत विद्यालय, न्हावी) अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, चेअरमन, पी एच महाजन, सचिव हर्षल महाजन. संचालक डॉ.के.जी.पाटील, संचालक जयंत बेंडाळे, मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी, शिक्षक बी.पी बोरोले, एम.आर.सुपे, न्यू इंग्लिश स्कूल भालोदचे संचालक भास्कर पिंगळे, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, प्रगती विद्यालय रोझोदाच्या सचिव डॉ.मनीष फेगडे, मुख्याध्यापक पी.टी.लासुरे, शिवाजी हायस्कूल खानापूरचे मुख्याध्यापक एस.बी.कुमावत, प्रियांका झोपे थोरगव्हाणचे अरविंद झोपे आदी मान्यवरांसह शरद महाजन, पी एच महाजन, तिलोत्तमा चौधरी यांनी आपापल्या मनोगतात उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व संगणक भेटीबद्दल आभार मानले.

Protected Content