कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी ! : वाहनधारक त्रस्त्र

यावल- अय्युब पटेल | तालुक्यातील राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यंतच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

यावल ते भुसावळ या मार्गावरील राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यंत रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामास मागील आठ दिवसापासुन सुरूवात झाली आहे. या मोठया वाहनांची वर्दळ असणार्‍या व विविध राज्यातुन जाणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतुकी साठीचा हा एक पर्यायी मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते याची कल्पना असतांना यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदरच्या रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता कॉंक्रीटीकरणा चे काम सुरू करण्यात आले आहे.

सदर अडचण लक्षात घेता वाहतुकीसाठी दुसरा पर्यायी मार्ग देणे हे अत्यंत गरजेचे असुन असे असतांना ही मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ व दुर्लक्षीत कारभारामुळे रस्त्याच्या कॉंकिटीकरणाचे काम सुरू असतांना त्याच रस्त्याची दुसरी बाजुचा मार्ग हा वाहतुकीसाठी सोडण्यात आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. यामुळे, वाहनधारकांना अडचण निर्माण झाली असुन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असुन, या वाहतुकीची नेहमीच वर्दळ असणार्‍या मार्गावर अवजड वाहने रस्त्यावर वारंवार अडकल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे.

दोन दोन तास वाहतुक सुरळीत होण्यास लागत असल्याने वाहनधारकांना व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या मार्गावरील होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करून ईतर मार्गावरून वळविण्यात यावी अशी मागणी नागरीकांसह वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content