श्रीराम रथोत्सवानिमित्त २ क्विंटल साबुदाणा महाप्रसाद वाटप सोहळा


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजातील ऐक्य, भक्ती आणि सेवाभाव जागविणारा उपक्रम जळगाव शहरात पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महर्षी श्रृंग ऋषी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुभाष चौक येथे तब्बल २ क्विंटल साबुदाणा खिचडी आणि ५११ डझन केळींचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. या भव्य महाप्रसाद उपक्रमामुळे रथोत्सवाला अधिक आध्यात्मिक आणि सामाजिक रंग प्राप्त झाला.

या उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, विभागाध्यक्ष दीपक राठोड, भूषण ठाकूर, राहुल चव्हाण यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महर्षी श्रृंग ऋषी संस्थेच्यावतीने अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यक्ष रवी पांडे, श्याम जोशी, प्रेम जोशी, लाला ओझा, उत्तम जोशी, सुरज नागला यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

महाप्रसाद वितरणासाठी महर्षी श्रृंग ऋषी संस्थेचे संजय व्यास, राजू ओझा, योगेश व्यास, उत्तम जोशी, श्याम जोशी आदींचे अनमोल सहकार्य लाभले. भक्तगण आणि नागरिकांनी या प्रसादाचे मोठ्या श्रद्धेने ग्रहण केले.

धर्म, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम श्रीराम रथोत्सवाच्या पवित्र वातावरणात लोकांच्या मनाला भावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महर्षी श्रृंग ऋषी संस्थेच्या या संयुक्त प्रयत्नांचे शहरभर कौतुक होत आहे.