ग्रामपंचायत कर्मचारी पदोन्नती नियुक्तीवर आक्षेप

notice to the jalgaon zp ceo 20180588764

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या रिक्‍त पदांच्या १० टक्‍के पदोन्नती ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येतात. त्यानुसार काल गुरुवारी १९ रोजी ग्रामपंचायतींमधील २७ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये पदोन्नतीवर नियुक्‍ती देण्यात आली. मात्र, या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आले आहे.

या पदभरतीत ५ टक्के पदे अपंगांसाठी राखीव ठेवण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. मात्र त्यानुसार पदोन्नतीने पदे भरण्यात आली नसून भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे आरोप करत दिलेल्या नेमणुका रद्द करण्यात यावी अशी मागणी नशिराबाद येथील ग्रामपंचायत कर्मचारी गणेश चौधरी यांनी केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना देण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील याबाबतचे निवेदन देणार असल्याचे गणेश चौधरी यांनी सांगितले.जिल्हा परिषदेतील रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात २००५ च्या ग्रामविकास विभागाच्या शासन पत्रकानुसार जिल्हा परिषदांच्या रिक्‍त पदांमधील १० टक्‍के पदांची भरती ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घ्यायचे असते. त्यानुसार जिल्हा परिषदेत ही प्रक्रिया झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील २७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या ऑर्डरला ७ सप्टेंबरला मंजूरी देण्यात आली होती. या मंजूरीनुसार या २७ कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवक, ग्रामसेवक, स्थापत्यसेवक यासह अन्य काही पदांवर नियुक्‍ती देण्यात आली आहे.

Protected Content