यावल येथे अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे विविध मागण्यांचे निवेदन

yawal adiwashi news

यावल, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुकासह इतर तालुक्यातील शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह प्रवेशासह इतर समस्या संदर्भातबाबत अ.भा. आदिवासी विकास परिषदेतर्फे विविध मागण्यांचे निवदेन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, जिल्हा उपअध्यक्ष सागर पावरा, साहेबराव पावरा, केशव पावरा, तेगा पावरा, दिनेश वसावे, केशव पावरा, दिपक पावरा, योगेश्वर पावरा आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात या आहेत मागण्या
चोपडा येथील शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृहाच्या इमारत बाधण्यासाठी शासकीय जागा त्वरित मिळावी, शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह जळगाव जिल्हासह तालुकास्तरावर उर्वरित सर्व पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनीनीची यादी त्वरित प्रसिद्ध करून त्वरित प्रवेश देण्यात यावे, पदव्युत्तर नंतर बीएड अभ्यासक्रमात दरवर्षी प्रमाणे वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे, शैक्षणिक या वर्षाचा निर्वाह भत्ता, डी.बी.टी रक्कम त्वरित देण्यात यावी, सन-२०१८-१९ वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावे,  संयम योजनाबंद करून वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी, यावल प्रकल्प कार्यालयात वसतिगृहाचा कामकाज पाहणाऱ्या कर्मचारी अनुभव कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात यावी, यादीत आलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीना वसतिगृहात प्रवेश व एचसीईटी टॉली, टायपिंग प्रशिक्षण, वसतिगृहात पिण्यासाठी वॉटर कूलर, सौरऊर्जा संच बसविण्यात यावे, मुला-मुलीच्या वसतिगृहाताची इमारती दुरुस्ती व वाचनालय सुरू करण्यात यावे, वसतिगृहात इतर जिल्हाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना प्रवेशित असतात अशा एमएचसीईटी,टाईपिंग प्रशिक्षण कोर्सेस सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

Protected Content